मन्नाथ, हरंगुळ यात्रा स्पेशल बस सेवे सूरू करा, आम आदमी पार्टीची मागणी.
मन्नाथ, हरंगुळ यात्रा स्पेशल बस सेवे सूरू करा, आम आदमी पार्टीची मागणी.

गंगाखेड प्रतिनिधी.श्रावण सोमवार निमित्त श्रीक्षेत्र मन्नाथ व नागपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र हरंगुळ या ठिकाणी यात्रा स्पेशल बस सेवा सुरू करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगांवकर यांचे नेतृत्वाखाली गुरुवारी गंगाखेड आगार प्रमुखांना लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
श्रावण महिना आगामी आठवड्यात सुरु होत आहे.श्रावण सोमवारी गंगाखेड परिसरातील भाविकांचे ग्रामदैवत असलेल्या श्रीक्षेत्र मन्नाथ येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. यात बालके, महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.
गंगाखेड लातूर रोडवर असलेल्या श्रीक्षेत्र मन्नाथ येथे जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी गंगाखेड शहरातून यात्रा स्पेशल बस सेवा सुरू करावी व या मार्गावरील सर्व बसेसना विनंती बस थांबा द्यावा. अशी मागणी निवेदना द्वारे या वेळी करण्यात आली.
या बरोबर मराठवाड्यातील सर्वात प्रसिद्ध यात्रा असलेल्या राजा भर्तरीनाथ महाराज यांच्या समाधी च्या दर्शनासाठी हरंगुळ येथे नाग पंचमीच्या दिवशी लाखो भाविक जमतात. या भाविकांना दर्शनासाठी गंगाखेड येथून यात्रा स्पेशल बस सेवा सुरू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
यात्रा स्पेशल बस सेवेमुळे आगाराचे उत्पन्न वाढणार असून ज्येष्ठ नागरिक बालकांनाही दर्शनाची संधी या निमित्ताने मिळणार आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदना वर आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, ह. भ. प. रामायणाचार्य रोहिदास महाराज मस्के, हरंगुळ ग्राम पंचायतीचे सरपंच बबन पठाण , हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामेश्वर भोसले पाटील ,वागलगावचे माजी सरपंच नारायणराव घनवटे , सामाजिक कार्यकर्ते राहुल साबणे , विक्रम बाबा इमडे,बालासाहेब भोसले ,रवीकुमार बर्वे ,श्रीधर सातपुते, किशोर खाडे आदीं भाविकांच्या स्वाक्षऱ्या आहेत . दोन्ही ठिकाणी बस सेवा सुरू झाल्यास भाविकांची मोठी सोय होऊनरा.प.म.च्या उत्पन्नातही वाढ होईल असे मत पडेगांवकर यांनी व्यक्त केले आहे.

0 टिप्पण्या