गोळेगाव वासियांतफेॅ श्री क्षेत्र फळा येथे आषाढी एकादशीनिमित्त फराळाचे आयोजन.

 गोळेगाव वासियांतफेॅ श्री क्षेत्र फळा येथे आषाढी एकादशीनिमित्त फराळाचे आयोजन. 


पालम प्रतिनिधी  :- प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी श्री संत मोतीराम महाराज श्री क्षेत्र फळा ता.पालम येथे आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविक भक्त श्रींच्या दश॔नासाठी येत असतात. सदरील भक्त गणांची मोफत फराळाची व्यवस्था गेली सात वर्ष गोळेगाव येथील समस्त गावकरी मंडळी करीत आहेत. त्याच प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र  फळा येथे फराळाच्या  पंगतीचे केलेले आहे. तरी श्री क्षेत्र फळा येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी एकादशी फराळाचा लाभ घ्यावा असे आवाहन दिलीपराव दुधाटे,सितारामजी दुधाटे,सुरेशराव दुधाटे,गोविंद दुधाटे,विष्णुदास दुधाटे,किसनराव दुधाटे,हरिभाऊ दुधाटे,मारोतराव दुधाटे, माऊली दुधाटे,हनुमान दुधाटे  तसेच समस्त गावकरी मंडळी गोळेगाव ता.पुर्णा जि.परभणी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या