शेळगाव येथे श्री संत सावता माळी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न .
विजय शेवाळे परंडा:-परंडा तालुक्यातील शेळगाव गावामध्ये श्री.संत सावता माळी अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी , नजरेत सदैव नवी दिशा असावी , घरट्याच काय ते बांधता येत केव्हांही , क्षितिजाच्या पलिकडे झेप घेण्याची दादासाहेब तुमची इच्छा पूर्ण होवो भगवान परमात्म्या चरणी प्रार्थना .
१ ) श्री दादासाहेब सावता शेवाळे ( उदयोपती पुणे ) यांच्याकडून श्री संत सावता माळी महाराज सप्ताह साठी एक लाख एक रुपये ( १००००१ )देणगी दिली तर,२ ) शिवसाई दूध संकलन केंद्र शेळगांव . पाच हाजार रुपये ( ५००० )देणगी दिली
हभप खोसे महाराज यांची काल्याची किर्तनाची सेवा झाली . दरम्यान काही मान्यवरांचा सत्कार झाला . दादासाहेब सावता शेवाळे ( उद्योगपती पुणे ) हभप खोसे महाराज , आबासाहेब देशमुख , सुनिल महाराज , नवनाथ बाबा शेवाळे , परदेशी सर , हनुमंत हुरकुडे , अशोक गुळवे , राजेंद्र जगताप , वैभव शेवाळे , संदीप जगताप , भाऊ गांगर्ड, संयोजक शहाजी शेवाळे ( अध्यक्ष ) चञभुज शेवाळे , रूपचंद शेवाळे , विजय शेवाळे , नवनाथ शेवाळे , राजेंद्र शेवाळे , समस्त सावता माळी प्रतिष्ठान व शेळगांव ग्रामस्त उपस्थित होते

0 टिप्पण्या