तिरुपती नगर मधील श्री बालाजी मंदिर येथे कल्याण उत्सवाच्या निमित्ताने पालम येथील बालाजी मंदिर मध्ये महापूजेचा कार्यक्रम संपन्न

 

तिरुपती नगर मधील श्री बालाजी मंदिर येथे कल्याण उत्सवाच्या निमित्ताने  पालम येथील बालाजी मंदिर मध्ये महापूजेचा कार्यक्रम संपन्न


   

पालम प्रतिनिधी अवधूत जाधव

 
पालम येथील भाविक भक्तांनी तिरुपती नगर येथे दोन हजार एकेविस साली नविनतम श्री बालाजी देवस्थान स्थापना केली असून धार्मिक उत्सव रितीने, श्री बालाजी मंदिर येथे कल्याण उत्सव साजरा केला जातो, त्या निमित्ताने  येथील सर्व भाविक भक्तांची कमिटीची बैठक घेऊन, पूजेच्या कार्यक्रमासाठी सोडतचिट्टी  काढण्यात येते.त्याच पध्दतीने दिनांक २९/०८/२०२२, शुक्रवारी सोडतचिठ्ठी काढली असता,पालम येथील अनुजा टुर ऑंड ट्रॅव्हल्सचे मालक श्री अवधूत जाधव यांच्या नावाने सोडतचिठ्ठी निघाली, त्यामुळे दिनांक 29 जुलै रोजी सायंकाळी ७:०० वाजता महापूजेचा मान हा श्री अवधूत बालासाहेब जाधव यांना मिळाला, त्यानिमित्ताने अवधूत जाधव यांनी सहकुटुंब सहपरिवार देव ब्राह्मण यांच्या मंत्रोच्चारात श्री बालाजी मंदिरात महापुजा केली व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला, यावेळी पालम येथील सर्व भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती महापूजा  कार्यक्रम झाल्यानंतर सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या