श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची शेळगाव येथे सांगता

 श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची शेळगाव येथे सांगता


विजय शेवाळे परांडा :- परंडा तालुक्यातील शेळगाव येथे श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली दिनांक 21 जुलै रोजी सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताहाची 27 जुलै रोजी काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने सांगता करण्यात आली

ह.भ.प. परमेश्वर महाराज खोसे यांचे 11 ते 1या वेळेत हरी किर्तन संपन्न झाले त्यानंतर महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित आणि महाप्रसादाचा भक्तांनी लाभ घेतला

तर सात दिवसांच्या या अखंड हरिनाम सप्ताहासाठी व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प. आबासाहेब देशमुख महाराज शेळगावकर यांनी काम पाहिले

तर या अखंड हरिनाम सप्ताहासाठी,

 श्री संत सावतामाळी तरुण मंडळ शेळगाव व समस्त वारकरी मंडळ शेळगाव यांनी विशेष परिश्रम घेतले



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या