पालम तालुक्यातील तेलजापुर शिवारात विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास जीवदान
पालम प्रतीनिधी,दि.16 : तालुक्यातील तेलजापुर शिवारात एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास वन विभाग, पोलिस व ग्रामस्थांनी संयुक्तपणे मोहिम राबवून जीवदान दिले.
शनिवारी (दि.16) पहाटे हा कोल्हा विहिरीत पडल्यानंतर संबंधित शेतकर्याने ग्रामस्थांना कल्पना दिली. ग्रामस्थांनी तातडीने पोलिस व वनविभागास माहिती कळविली.पालम पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे, वनपाल सीमा राठोड यांच्यासह अन्य सहकारी घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांच्या सहकार्याने या पथकाने त्या कोल्ह्यास सायंकाळी 4 च्या सुमारास विहिरीबाहेर काढून जीवदान दिले.


0 टिप्पण्या