केंद्रीय प्राथमिक शाळा जिल्हा परिषद चाटोरी येथे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पदी साहेब अण्णा नकाते तर उपाध्यक्ष पदी बालासाहेब दिवसे

 केंद्रीय प्राथमिक शाळा जिल्हा परिषद चाटोरी येथे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पदी साहेब अण्णा नकाते तर उपाध्यक्ष पदी बालासाहेब दिवसे


पालम प्रतिनिधी बाळासाहेब पैके :- केंद्रीय प्राथमिक शाळा चाटोरी येथे शालेय शिक्षण समितीची निवड करण्यात आली, शाळा व्यवस्थापन व विद्यार्थी सर्वेक्षण करण्यात यावे व गावातील लोकांना शाळेत होणाऱ्या शैक्षणिक विकास व विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील समन्वय,शाळेची गुणवत्ता याबाबत इत्यंभूत माहिती मिळावी,

 शाळेवर नियंत्रण राहावे, यासाठी शासनाने शालेय शिक्षण समिती स्थापन केली असल्याने, केंद्रीय प्राथमिक शाळा चाटोरी येथील मुख्याध्यापक श्री राम चाटे व लुल्ला शेख यांनी, गावातील प्रतिष्ठित नागरिक बोलवून शिक्षण समिती अध्यक्ष निवडीसाठी चर्चा केली

 व सर्वानुमते शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पदी साहेब अंणा नखाते तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब दिवसे यांची निवड करण्यात आली, यावेळी गावचे विद्यमान उपसरपंच वैजनाथ इंदोरे, गोदाजी नखाते, गंगाधर मस्के व सदस्य मंडळी तसेच गंगाधर मेकाले, गोपाळ रावसाहेब गव्हाणे, गणेश मारुती शिंदे,नामदेव नागोराव सुरनर, मारुती कारभारी दिवसे, इत्यादी सदस्य व शिक्षक वृंद उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या