कर्जबाजारीपणाला कंटाळून कापशी येथील शेतकऱ्याची आत्महत्या.
पालम प्रतिनिधी :- तालुक्यातील कापसी येथे नैराश्य व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 27 वर्षीय तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास लावून जीवन यात्रा संपवल्याची दुःखद घटना 8 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
मुंजाजी तुकाराम शिंदे वय 27 वर्ष रा. कापसी असे मयताचे नाव आहे. त्यांना कापसी शिवारात 1.50 एकर जमीन असून त्याच्या नावे पीककर्ज आहे. तसेच आर्थिक व्यवहार सांभाळताना त्यांना मोठ्या प्रमाणात खाजगी देणी झाली होती. शेतात निघणारे उत्पादन कमी व कर्ज जास्त झाल्याने ते मागील अनेक दिवसा पासून नैराश्याच्या गर्तेत सापडले होते. 8 जुलै रोजी रात्री सर्वजन झोपले असताना मुंजाजी शिंदे याने गळफास लावून जीवन यात्रा संपवली. 9 जुलै रोजी सकाळी 6 वाजता ही घटना त्याच्या आई ला जाग आल्यावर उघडकीस आली. पालम येथे ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करून कापसी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्याच्या पश्चात आई , वडील असे कुटुंब आहे.

0 टिप्पण्या