लोणारवाडी (शेळगाव) जल अभियान अंतर्गत माणिकबाबा विध्यालयात फिल्टर प्रोजेक्टचे उदघाटन

 लोणारवाडी (शेळगाव) जल अभियान अंतर्गतमाणिकबाबा विध्यालयात फिल्टर प्रोजेक्टचे उदघाटन


विजय शेवाळे परंडा :- दिनांक 27 वार-बुधवार रोजी पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम वाॅटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट अहमदनगर ,इंडसन बॅंक मुंबई यांच्या अर्थसाहाय्याने व उस्मानाबाद जिल्हा वाॅटर शेड यांच्या विद्यमाने,लोणारवाडी (शेळगाव) जल अभियान अंतर्गत   माणिकबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेळगाव ता ‌परांडा जि.उस्मानाबाद येथे पाणी फिल्टर प्रोजेक्टचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले.या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परांडा तालुक्याचे जेष्ठ नेते मा.ॲड.सुभाषराव मोरे माजी उप अध्यक्ष उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.कांतिलाल गिते साहेब (प्रोजेक्ट मॅनेजर तथा उस्मानाबाद जिल्हा वाॅटर शेड प्रमुख)व मा ‌.समिना पठाण मॅडम (सामाजिक विकास अधिकारी उस्मानाबाद) हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.तर माजी प्राचार्य मा.संभाजीराव मोरे प्राचार्य मा.श्री.गुरुदास काळे , युवा नेते विलास मोरे, बाबुराव दैंन, शेळगावचे उप सरपंच राजेंद्र जगताप,लोणारवाडी जल सेवक ,श्री.बाळासाहेब जामदारे,ग्राम समितीचे अध्यक्ष दत्तात्रय किर्दक,ग्राम समितीच्या सचिव सुवर्णा बाळासाहेब जामदारे, नितीन पोटे साहेब, अर्चना मुळे मॅडम,माणिकबाबा विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पाणी फिल्टर प्रोजेक्टचे उद्घाटन करण्यात आले.व सरस्वतीच्या फोटोंचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या उपस्थित सर्व मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.या वेळी मा.गिते साहेब यांनी स्वच्छ पाणी, आरोग्य, आणि पाणी फिल्टर, लोकसहभाग इ.विषयी सखोल असे मार्गदर्शन केले,व विद्यालयाचे प्राचार्य श्री.गुरुदास काळे यांनी पाणी फिल्टर प्रोजेक्टची काळजी घेवून विद्यार्थीना स्वच्छ पाणी नेहमी उपलब्ध ठेवू असे सांगितले व मान्यवरांचे स्वागत करुन आभार ही व्यक्त केले .या वेळी अध्यक्षीय भाषणात परांडा तालुक्याचे जेष्ठ नेते मा.ॲड.सुभाषराव मोरे(भाऊ) यांनी बोलताना सांगितले की विद्यालय आणि विद्यार्थी यांच्या साठी अनेक वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो‌.त्याचाच एक भाग म्हणून हा पाणी फिल्टर प्रोजेक्ट आहे.विद्यार्थी आणि त्यानंचे आरोग्य हे स्वच्छता व स्वच्छ पाणी यांवर अवलंबून आहे.विद्यार्थ्यानी याचा चांगला उपयोग करावा ‌.निरोगी राहून गुणवंत, ज्ञानवंत व्हावे असे सांगितले व गिते साहेब व त्यांच्या सर्व स्टीमंचे आभार व्यक्त केले.या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.कुमटकर सर यांनी तर आभार श्री.दूरुंदे सर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या