विश्वकर्मा महाविद्यालय ,उघडा महादेवाजवळ, परभणी येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या परभणी जिल्ह्याचा मेळावा आयोजित.

 विश्वकर्मा महाविद्यालय ,उघडा महादेवाजवळ, परभणी येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या परभणी जिल्ह्याचा मेळावा आयोजित.


पालम प्रतिनिधी


 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 

 परभणी जिल्ह्याचा मेळावा व बैठक बैठकीचे स्थळ विश्वकर्मा महाविद्यालय ,उघडा महादेवाजवळ, परभणी येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या परभणी जिल्ह्याचा मेळावा दिनांक १६ जूलै २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे,महाराष्ट्र अंनिसच्या प्रत्येक  राज्य कार्यकारिणी बैठकी नंतर ,जिल्हा पदाधिकारी आणि जिल्ह्यातील राज्य पदाधिकारी यांनी त्या त्या  जिल्ह्याची, जिल्हा बैठक अथवा मेळावा यांचे लगेच  आयोजन करावे, अशी संघटनेची कार्यपद्धती असल्याने, परभणी जिल्ह्याची प्रत्यक्ष  बैठक तथा मेळावा शनिवार  दिनांक १६ जूलै २०२२ रोजी १२.३० वाजता नियोजित ठिकाणी आयोजित केला आहे.तरी परभणी शहर व जिल्ह्यातील सर्व शाखांचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी बैठकीला वेळेवर व  पूर्णवेळ उपस्थित राहावे,अशी विनंती आहे.या बैठकीचा अजेंडा पुढीलप्रमाणे असेल, प्रथम चळवळीचे गीत,स्वागत परिचय,जिल्हा कार्याध्यक्षाचे प्रास्ताविक,शाखांच्या प्रतिनिधींचे मनोगत व शाखांच्या कामकाजाच्या अहवालाचे वाचन,औरंगाबाद येथील  विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीचा संक्षिप्त आढावा राज्य पदाधिकारी घेतील,

जिल्हा पदाधिकारी होण्यासाठीचे निकष,कामाचे स्वरूप,  जबाबदारी,क्षमता,मर्यादा याबाबत सविस्तर चर्चा,जिल्हा कार्यकारिणीची निवड व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन,जिल्हा  शाखा व जिल्ह्यातील शाखांचे संघटनात्मक तसेच उपक्रमात्मक  कामकाजाचे पुढील तीन महिन्याचे नियोजन, ऐनवेळी घेतलेले विषय, जिल्हा प्रधान सचिव आभार मानतील व कार्यक्रमाचा समारोप होईल, 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या