यशस्वीनि सामाजिक अभियानांतर्गत विधवा महिलांचा सन्मान.

 यशस्वीनि सामाजिक अभियानांतर्गत विधवा   महिलांचा सन्मान.

विजय शेवाळे/शेळगाव :- परंडा तालुक्यातील डोमगाव मध्ये आज दि 21 जुलै रोजी यशस्वीनि सामाजिक अभियानांतर्गत विधवा महिलांना बोलवून त्यांचा सन्मान करण्यात आला.सुप्रिया ताई सुळे आणि  रुपाली ताई चाकणकर आणि मराठवाडा महिला राष्ट्रवादी च्या सन्माननीय अध्यक्षा सौ वैशाली ताई मोटे यांच्या मार्गदर्शनातून घेण्यात आला तसेच  शेळीवाटपाचे फार्म भरले तसेच विधवा महिलांना कुंकु लावून गुलाबाचे फुलं देऊन स्वागत करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनाक्षी काळे यांनी केले राष्ट्रवादी तालुका अध्यक्षा दैवशाला सहदेव खैरे तसेच  ग्रामपंचायत सदस्या सुनंदा पाटिल सरपंच  महादेव पोपळे  जिल्हा मजुर फेडरेशनचे संचालक बापुराव मिस्किन  ग्रामसेवक  जाधव मॅडम राष्ट्रवादी चे युवा नेते सुहास गोडसे  सि आर पी  संध्या जगताप व गावातील सर्व विधवा महिला उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या