भाविकांच्या भक्तिरसात न्याहले पेंडू नगरी
पालम तालुका प्रतिनिधी ; अवधूत जाधव
पालम शहरापासून जवळच असणारे पेंडू येथील निवृत्ती महाराज मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
हजारो भाविका पेंडू येथे दर्शनासाठी जातात पण जाण्यासाठी रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता कळत नसल्यामुळे भावीकाना तारेवरची कसरत करून दर्शनासाठी जावे लागते आहे
पालम शहरापासून जवळच असणारे पेंडू हे गाव छोटे पंढरपूर म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले आहे पेन्डु येथील निवृत्तीनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी आज सकाळी पासूनच जिल्ह्यातील विविध भागांतील भाविक भक्त दिंडी घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत पेन्डु येथे दाखल होतात
ज्या भाविकांना पंढरपुरात जाता आले नाही त्यासाठी दुसरी पंढरी म्हणुन पेंडू या गावाची ओळख होत आहे ऊन, पाऊस, वारा ,याचीही पर्वा न करता हजारो भाविक भक्त पायपीट करत या ठिकाणी येत असतात .व नवसाला पावणारा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अभंगाप्रमाने नवसाला पावणारा निवृत्तीनाथाच्या दर्शन भाविकांना रस्त्याने जाताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पालम पोलिसांकडून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरवर्षी आषाढी एकादशी यात्रेनिमित्त लाखो भाविकांची मांदियाळी या पवित्र धार्मिक स्थळाला उसळते.
गतवर्षाप्रमाणेच यंदाही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे आषाढी एकादशी यात्रेनिमित्त दर्शनासाठी येणार्या् भाविकांची सोय करण्यात आली आहे
भाविकांना अनेक संस्थांनाकडून साबुदाणा, खिचडी, चहा, नाश्ता पाणी देण्यासाठी या भागातील अनेक स्वयंसेवक हजर होते
भाविक भक्तांना दर्शनासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी मोलाचे सहकार्य केले


0 टिप्पण्या