नांदेड-तिरुपती दरम्यान चार विशेष गाड्या
नांदेड - तिरुपती साप्ताहिक विशेष सेवा : गाडी क्रमांक 07633 हि गाडी दिनांक 16 जुलै आणि 23 जुलै, 2022 रोजी शनिवारी दुपारी 12.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चित्तापूर, सुलेहाल्ली, यादगीर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकळ, गुती, तादिपात्री, येर्रागुंतला, कडप्पा, रेनिगुंता मार्गे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 08.30 वाजता पोहोचेल.
तिरुपती-नांदेड साप्ताहिक विशेष सेवा : गाडी क्रमांक 07634 हि गाडी दिनांक 17 जुलै आणि 24 जुलै, 2022 रोजी रविवारी रात्री 21.00 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी 17.20 वाजता सुटेल.
या गाडीत प्रथम श्रेणी वातानुकुलीत द्वितीय श्रेणी वातानुकुलीत तृतीय श्रेणी वातानुकूलित, स्लीपर क्लास, जनरल आणि एस. एल.आर डब्बे असतील.


0 टिप्पण्या