परळी गंगाखेड रस्त्यावर रुग्णवाहिकेचा अपघात, चालक जाग्यावरच ठार,
JBN NEWS गंगाखेड प्रतिनिधी
गंगाखेड येथील रुग्णवाहिका अंबाजोगाई रुग्णालयात रुग्णाला सोडून परत येत असताना परळी गंगाखेड रस्त्यावरील दगडवाडी जवळ सकाळी नऊच्या सुमारास रुग्णवाहिकेचा अपघात, चालकाचा जाग्यावरच मृत्यू झाला,
गंगाखेड येथील रुग्णवाहिका अंबेजोगाईहून गंगाखेड कडे परत येत असताना, परळी गंगाखेड रस्त्यावरील दगडवाडी येथील चढावर गाडी चढत असताना, चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी जागीच पलटी झाल्याने चालक जाग्यावरच ठार झाला,
सदर घटनेची सविस्तर माहिती परळी ग्रामीण पोलीस ठाण्याला कळवली असता, परळी पोलीस ठाण्यातील कार्यदक्ष पोलीस निरीक्षकांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन, अपघाताची पाहणी केली असता,आंबुलंस गाडीवर नगरसेवकाचे नाव असून, चालक गंगाखेड येथील रहिवासी,असून गजानन चिलगर असे मृत चालकांचे नाव असल्याचे समजले, पुर्ण चौकशी अंती उत्तरीय तपासणीसाठी चालकाचा मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला,

0 टिप्पण्या