पालम येथील भारतीय स्टेट बँक येथील बँक कर्मचारी शेतकऱ्यांना
पिक कर्ज मंजूर करण्यासाठी करत आहेत पैशाची मागणी
परभणी प्रतिनिधी JBN NEWS
पालम तालुक्यात स्टेट बँक हैद्राबाद व भारतीय स्टेट बँक या दोन शाखा होत्या परंतु स्टेट बँक ऑफ हैदराबाद ही शाखा भारतीय स्टेट बँक मध्ये विलीकरण झाल्यामुळे संपूर्ण पालम तालुक्याचे व शहराचे पूर्ण कारभार भारतीय स्टेट बँक पालम या शाखेवर चालतो या शाखेवर ग्राहकांची असंख्य गर्दी असते व सध्या जुन/जुलै महिना चालू असल्यामुळे पीक कर्जमंजूर करण्यासाठी शेतकऱ्यांची भरपूर गर्दी जमते या शाखेमध्ये शाखा व्यवस्थापक यांची बदली झाल्यामुळे बरंच दिवसा पासून शाखा व्यवस्थापक नसल्यामुळे येथील कर्मचारी ग्राहकांना उद्धटपणे वागून देत आहेत यामध्ये काही कर्मचारी शेतकऱ्यांना पिक कर्ज मंजूर करण्यासाठी शेतकऱ्यांना काही रक्कम अगोदर घेतली जाते व काही रक्कम बँकेत सही अंगठे करण्यासाठी आल्यानंतर बाकी रक्कम घेतली जाते दि 01/07/2022रोजी फिल्ड अधिकारी मेंहद्र राय सिंग मिटींगला गेल्यानंतर शेतकऱ्यांना बोलावून पैशाची मागणी केली काही शेतकऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिला त्या कर्मचाऱ्यास आर्यवराची भाषा उदंड बोलणे अशी वागून दिले जाते यामध्ये शाखे मध्ये कर्मचाऱ्यावर कसलेच प्रकारचे नियंत्रण राहिलेले नाही कर्मचारी अर्वाची भाषेत बोलून तुम्ही वरिष्ठांना लेखी तक्रार केली तरी माझे तुम्ही काही करू शकत नाही यामुळे सदरील शेतकऱ्यांनी या कर्मचाऱ्यांच्या विरोधात क्षेत्रीय व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक परभणी यांच्याकडे तक्रार केली आहे सदरील कर्मचाऱ्यास योग्य ती कारवाई करावी अन्यथा सर्व शेतकरी बँकेसमोर पंधरा दिवसा नंतर उपोषणाला बसण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहेत रेखा गायकवाड ज्ञानेश्वरी गाणार अरुणा गाणार हरीबाई कांबळे सरूबाई गाणार विलास पवार केली आहे यशवंत गाणार जावेद पठाण नागेश शिंदे शिवाजी गाणार जिवन सोनकांबळे सुरेश मोडके इत्यादी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

0 टिप्पण्या