का. र .मित्र पुरस्काराने पौळ यांचा सन्मान
. पालम तालुका प्रतिनिधी
अवधुत जाधव
पालम: महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने देण्यात येणारे प्रतिष्ठेचे 'मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक' अक्षरदान दिवाळी अंकाचे संपादक, फरकंडा येथील तरुण मोतीराम पौळ यांना ९५ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार, वि. दा. पिंगळे उपस्थित होते.
रोख रक्कम, सन्मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. अक्षरदानला मिळालेला हा यंदाचा दुसरा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. याबद्दल कवी इंद्रजीत भालेराव, सरपंच बापूराव पौळ, चेअरमन चंद्रकांत पौळ, फरकंडा ग्रामस्थ, माधवराव पाटील कॉलेज पालमचे सर्व प्राध्यापक यांनी पौळ यांचे अभिनंदन व कौतुक केले.


0 टिप्पण्या