बहु विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित मौजे चाटोरी निवडणूक 2022 शेतकरी विकास पॅनलचा दनदनीत विजय,13 पैकी 13 उमेदवार विजयी,
पालम प्रतिनिधी बाळासाहेब पैके :- चाटोरी येथे दिनांक 24 जूलै 2022 रोजी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित चाटोरी, चुरशीच्या लढतीत, पॅनल प्रमुख आण्णासाहेब नारायणराव किरडे व कांतराव लालशिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, शेतकरी विकास पॅनलचे 13 पैकी 13 उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले,या निवडणुकीत,चाटोरी किरडे त्र्यंबक शेषराव,किरडे माणिकराव विठ्ठलराव, गव्हाने प्रल्हाद आंबादाराव,पैके ज्ञानोबा मुगाजी,मेकाले दैवशाला मोतीराम,दिवसे वसंत किशनराव, नव्हा गयाळ भोजाजी यमाजी,बाबर विश्वंभर रंगनाथ,भालकुडकी इचनर प्रभाकर धोंडीबा,बोरगाव कदम उद्धव बापुराव, वनभूजवाडी चौकले अनुसया बाबुराव, चोरवड गोपाळ प्रल्हादराव,कोनेवाडी पांढरे मन्मथ सदाशिव या सात गावांतील उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते, पॅनल प्रमुख आण्णासाहेब किरडे व कांतराव चव्हाण यांच्या अथक परिश्रमाने शेतकरी विकास पॅनलचे पैकीच्या पैकी उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाल्याने,बहु विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर शेतकरी विकास पॅनलचा झेंडा फडकला, या वेळी शंभर टक्के मतदान झाले,चाटोरी व परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,

0 टिप्पण्या