गावातील समशानभूमीचा 2016 वाद विकोपाला गेला,ग्रामपंचायत कार्यालयासमोरच पार्थिवाला मुखाग्नी दिला,
प्रत्येकी वेळी पोलीस संरक्षण घेऊनच व्हायचा अंत्यविधी
विजय शेवाळे परंडा प्रतिनिधी :- लगावात स्मशान भूमी नसल्याने संतप्त नातेवाईकानी चक्क गावातील ग्रामपंचायत कार्यालया समोर अंत्यविधी, धक्कादायक घटना ऐकून परिसरात एकच खळबळ उडाली,उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथील, मालु लिंगा दुधभाते यांचें दिनांक 31जूलै 2022 रोजी वृद्धपकाळाने वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले, अंत्यसंस्कार कोठे करावा,गावातील समशानभूमीचा 2016 पासून सुरू असलेला वाद अद्याप मिटला नसल्याने प्रत्येकी वेळी पोलीस संरक्षण घेऊन अंत्यविधी केला जात होता, यावेळी मात्र अंत्यविधी स्मशानभूमीतच करण्यासाठी मयताच्या नातेवाईकांनी ठाम भूमिका घेतली,
हाच प्रकार कोरेगाव तालुक्यामध्ये फरतडवाडी येथे ग्रामपंचायती समोर अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली, कोरेगाव तालुक्यामध्ये फरतडवाडी येथे अनेक वर्षांपासून स्मशान भूमी नसल्याने,मरणानंतरही मृतदेहाचे हाल होत असल्याचे धक्कादायक प्रकार कोरेगाव तालुक्यातील फडतरवाडी या गावात पाहायला मिळाला,फडतरवाडी गावात स्मशानभूमी नसल्याने गावातील व्यक्ती मयत झाल्यास अंत्यसंस्कार कुठे करायचा हा कायमचा प्रश्न,सध्या या भागात पडत असलेल्या मुसळधार पावसात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास अनेक अडचणींमुळे संतापलेल्या नागरिकांनी चक्क ग्रामपंचायतच्या समोरच सरण रचले,येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला,
घटनेचे गांभीर्य ओळखून आक्रमक नागरिकांना शांत करण्यासाठी, घटनास्थळी आलेल्या कोरेगाव तहसीलदार अमोल कदम आणि गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांना ग्रामस्थांनी घेराव घालून,स्मशानभूमीबद्दल जाब विचारला,अखेर तहसीलदारांनी गावातीलच एकादी पर्यायी जागा स्मशानभूमीसाठी देण्याचे कबूल करून,आक्रमक ग्रामस्थांना शांत करून,मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

0 टिप्पण्या