अन्यायकारक अग्निपथ भरती प्रक्रिया रद्द करा - तालुकाध्यक्ष कृष्णा भोसले

 अन्यायकारक अग्निपथ भरती प्रक्रिया रद्द करा - तालुकाध्यक्ष कृष्णा भोसले

 अग्निपथ भरती प्रक्रिया रद्द करा - तालुकाध्यक्ष कृष्णा भोसलेअन्यायकारक



पालम प्रतिनिधी:- अग्निपथ भरती प्रक्रिया रद्द करावी या सह विविध मागण्यांबाबत  पालम काँग्रेस पक्षाच्या वतीने दि 27 जून सोमवार रोजी तहसिलदार याना लेखी निवेदन देण्यात आले आहे.

  या निवेदना मध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी  अग्निपथ भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या वरील  आरोपावरून सुरू असलेल्या खोटी चौकशी त्वरित थांबवण्यात यावी, अशी मागणी ही करण्यात आली आहे.

 या निवेदनावर पालम तालुका काँग्रेस तालुकाध्यक्ष कृष्णा भाऊसाहेब भोसले,माजी तालुकाध्यक्ष गुलाबराव दादा सिरस्कर, शांतीस्वरूप जाधव,महिला तालुका अध्यक्ष अरुणा शर्मा, उत्तमराव गादगे, माधवराव फाजगे,  हाके साधू,राहुल  हतींअबिरे ,अकबर पठाण, शिवाजी आवळे, शेख अहमद भाई, हबीब चाऊस,  अनिल शिंदे, मयुर शिंदे,  माधव गिरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे निवेदन देतेवेळी पालम तालुक्यातील कॉंग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या