पत्रकार सुरक्षा समिती परभणी जिल्हा कार्याध्यक्षपदी शेषेराव सोपने यांची निवड !!
परभणी प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा, ज्येष्ठ पत्रकार सन्मान पेन्शन योजना, पत्रकारांसाठी विमा योजना, घरकुल योजना,यादीवर नसलेल्या वृत्तपत्राला पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती,पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची स्वतंत्र चौकशी, पत्रकारांना धमकी व मारहाण हल्ला, राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता, त्याचबरोबर कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून आर्थिक मदत,इत्यादी विषयावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावीपणे काम करत असून, पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलन उपोषण, निवेदन, राज्य सरकारला सादर करून पत्रकाराला न्याय देण्याची भूमिका पार पाडत आहे.
पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका बजावली असून, सर्व पत्रकारांना सोबत घेऊन काम करणारे, पत्रकारिता क्षेत्रात आपले आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे, जेष्ठ पत्रकार तथा जनतेचा बातमीदार न्युज चॅनल व पोर्टलचे मुख्य संपादक श्री शेषराव मोहणाजी सोपणे यांच्या कार्याची दखल घेऊन,पत्रकार सुरक्षा समिती परभणी जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
मराठवाडा विभाग अध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे, मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष यशवंत कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अप्पासाहेब कर्चे,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बळीराम पवार, सोलापूर जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार,महिला विभाग अध्यक्ष सुवर्णा सुना, सोलापूर जिल्हा संघटक दत्तात्रय पवार, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मनोज जैन, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, तसेच पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत




0 टिप्पण्या