गोळेगावकर यांना महाराष्ट्र जीवन गौरव साहित्यभूषण पुरस्कार घोषित

 

गोळेगावकर यांना महाराष्ट्र जीवन गौरव साहित्यभूषण पुरस्कार घोषित

राष्ट्रीयरत्न भाई लक्ष्मणरावजी गोळेगावकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा 



पालम प्रतिनिधी:- अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळाच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा महाराष्ट्र जीवनगौरव साहित्यभूषण पुरस्कार राष्ट्रीयरत्न भाई लक्ष्मणरावजी गोळेगावकर यांना घोषित झाला आहे.

हा पुरस्कार नांदेड येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनामध्ये मान्यवरांच्या हस्ते गोळेगावकर  यांना प्रदान करण्यात येणार आहे.

गोळेगावकरांनी शैक्षणिक क्षेत्रात परभणीत जिल्ह्यात एक आगळा वेगळा ठसा उमटवून महात्मा फुल्यांचा वारसा सातत्याने चालू ठेवलेला आहे.शिक्षणाची गंगा घरोघरी खेड्यापाड्यात पोहोचवली आहे. गोरगरीब , दीन दुबळे यांच्यासाठी अहोरात्र धडपडणारी बळीराजा शिक्षण संस्था म्हणून सर्वांना परिचितच आहे.

या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मराठी साहित्य मंडळाच्या वतीने अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा

राज्यस्तरीय पुरस्कार घोषित केला आहे. हा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष

ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर यांचे जाहीर आभार व राष्ट्रीयरत्न भाई लक्ष्मणरावजी 

गोळेगावकर यांचे सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव  होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या