पालम येथील मोबाईल टावर शोभेची वस्तू, ग्राहक त्रस्त रेंज मात्र सतत गुल,
पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव
पालम येथे एअरटेल वोडाफोन जिओ या कंपन्यांच्या छत्र्या एकाच टावरवर,बसविण्यात आल्या असल्याने, मागील काही दिवसापासून मोबाईलची रेंज वारंवार कमी अधिक होत असल्याने मोबाईलचा आवाज व्यवस्थित येत नाही,व फोन मध्येच कट होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलांना ऑनलाईन शिक्षण किंवा परीक्षेचा निकाल तसेच मुलांना विविध माहिती व ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल महत्वाचा आहे, परंतु या मोबाईल टावरणे मात्र नाकी नऊ आणले आहेत, असून अडचण नसून खोळंबा म्हणण्याची वेळ आली आहे, यासाठी याची तक्रार नेहमी कोणाकडे करावी हेच कळेना,या संयुक्त टावर मुळे नागरिकांना संवाद साधणे सुद्धा अवघड झाले आहे,
सध्याच्या परिस्थितीमध्ये मोबाईलचे रिचार्ज तर गगनाला भिडले आहेत, महिना संपण्याच्या अगोदरच चार पाच दिवसापासून मोबाईल सांगते आपले आउटगोइंग समाप्त होणार आहे आजच रिचार्ज करा कंपन्या काम करत आहेत पण सुविधा मात्र वाऱ्यावर फेकत आहेत.
ही परिस्थिती सध्या ग्रामीण भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे यासाठी जिओ वोडाफोन एअरटेल या कंपन्यांनी आपली तांत्रिक अडचण दुरुस्त करून लोकांची समस्या दूर करावी.
मोबाईल कंपनीने रेंज व्यवस्थापन सुरळीत करावी व नागरिकांची अडचण करावी नाहीतर
दहा हजारांचा मोबाईल फक्त मुलांच्या खेळण्याची वस्तू म्हणून उपयोगात आणण्याची वेळ ग्राहकावर आली आहे, अ
पेठ पिंपळगाव येथील माजी सरपंच शिवाजी रामराव गाणार यांनी विचार व्यक्त केले,

0 टिप्पण्या