उमरा हनुमान नगर, तालुका पालम जिल्हा परभणी येथे श्री हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा
दिनांक २५ मे २०२२ बुधवार रोजी सकाळी आठ ते बारा कलशारोहण सोहळा
श्री ह भ प ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर गंगोत्री आश्रम मालेवाडी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
पालम प्रतिनिधी व्यंकटेश मोरताटे / आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया ! कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा! गीता भागवत करिती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे! तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या जीवा पार नाही!
या संताच्या उक्तीप्रमाणे मौजे उमरा येथे श्री हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे
या निमित्य श्री गोविंदराव किशनराव गादगे, श्री रावसाहेब किशनराव गादगे, श्री उत्तमराव किशनराव गादगे यांनी
सर्व भाविक भक्तांना कलशारोहण सोहळ्याचा कार्यक्रमासाठी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे संयोजक नियोजक यांनी सर्व भाविक भक्तांना विनम्र आमंत्रित केले आहे.
याज साठी केला होता आटाहास्य । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥
आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥
कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥
मिती वैशाख कृष्णपक्ष १० शेळके १९४४ दिनांक २५ मे २०२२ बुधवार रोजी सकाळी आठ ते बारा कलशारोहण सोहळा व होमहवन कार्यक्रम व त्यानंतर दुपारी 12 ते 2 श्री ह भ प ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर गंगोत्री आश्रम मालेवाडी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल
तरी सर्व भाविक भक्तांनी या कलशारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवावी व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे गादगे परिवार व समस्त गावकरी उमरा यांनी विनम्र आमंत्रित केले आहे.


0 टिप्पण्या