लिंबोटी ग्रामपंचायत मधील आर.ओ.आर. फिल्टर बोगस, बिले लावून लाखो रुपये हडपले, ग्रामसेवक व सरपंचावर कारवाईची संतोष भावे यांची मागणी

 

लिंबोटी ग्रामपंचायत मधील आर.ओ.आर. फिल्टर गायब, बोगस बिले लावून लाखो रुपये हडपले,ग्रामसेवक व सरपंचावर कार्यवाईची संतोष भावे यांची मागणी  

ग्रामसेवक व सरंपचावर फसवणुकीचा गुन्हा दखल करून निलंबीत करण्याची मागणी



लोहा प्रतिनिधी :-  लोहा तालुक्यातील मौजे लिबोटी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आर. ओ. फिल्टर मशीन खरेदी केल्याचे योगस बिले लावून लाखो रुपये हडप करून शासनाची फसवणूक करणा-या ग्रामसेवक व सरंपचावर फसवणुकीचा गुन्हा दखल करून निलंबीत करण्याची मागणी ऑल इंडीया ब्ल्यू टायगर संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष भावे सावरगांवकर यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती लोहा यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

भावे यांनी या भ्रष्टाचारासंबंधाने प्रथम तक्रार दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी दिली होती, तद्नंतर पंचायत समितीच्या वतीने विस्तार अधिकारी यांनी चौकशी केली अस पंधराव्या चित्त आयोगा अंतर्गत झालेल्या कामाचे संपूर्ण अभिलेख तपाणीसाठी उपलब्ध केले नाहीत त्यामुळे झालेल्या कामाची सत्यता पडताळणी करता आली नाही. आर.ओ. फिल्टर यंत्र १५ व्या वित्त आयोग आराखड्यामध्ये मंजुरीचा समावेश नसताना नियमबाह्य पणे काम करून खर्च नोंदवला आहे तसेच आर. ओ. फिल्टर न बसवता परस्पर खर्च करून ५,७३,०००/- रुपयांचा अपहार केला असल्याने संबंधीत ग्रामसेवकाने कर्तव्यात कसूर केल्यामुळे लिंबोटीच्या ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कार्यवाही करण्याचा अहवाल विस्तार अधिकारी गायकवाड यांनी दि. १३ एप्रिल १ मे २०२२ रोजी देवूनही अद्यापपर्यंत लिचोटी येथील ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कार्यवाही प.स.लोहा ने केली नसल्यामुळे संबंधीत ग्रामसेवक व सरपंचावर तात्काळ कार्यवाही नाही केल्यास नांदेड जि.प. कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचे संतोष भावे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या