Homeउमरा तालुका पालम जिल्हा परभणी येथे श्री हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा संपन्न
उमरा तालुका पालम जिल्हा परभणी येथे श्री हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा संपन्न
योग्य मार्गाने मिळवलेल्या संपत्तीचा काही हीस्सा समाज कल्याणासाठी दान करणे हेच जिवनाचे सार - हभप श्री.मुडेकर महाराज
पालम प्रतिनिधी
आज पुरले नवसधन्य काळ हा दिआजवस,
उमरा येथे माळावर नविन गादगे नगर हि नविन वस्ती निर्माण झाली,गाव म्हणल कि गाव देवता, हणूमान मंदिर असायलाच पाहिजे,असा विचार करून वस्ती प्रमुख श्री गोविंदराव किशनराव गादगे, श्री रावसाहेब किशनराव गादगे, श्री उत्तमराव किशनराव गादगे यांनी, काही संत महात्म्यांशी सल्ला मसलत करून,राम भक्त श्री हणूमान मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला, वस्तीवरील सर्व समाज एकत्र येऊन, मंदिर बांधकाम पुर्ण केले,
आपुलिया हिता जो असे जागता | धन्य माता पिता तयाचिया || १ ||
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा ||धृ० ||
गीता भागवत करिती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे || ३ ||
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या जीवा पार नाही || ४||
या संत शिरोमणी तुकोबा रायाच्या अभंग वाणी प्रमाणे,मिती वैशाख कृष्णपक्ष १० शेळके १९४४ दिनांक २५ मे २०२२ बुधवार रोजी सकाळी आठ ते बारा कलशारोहण सोहळा व होमहवन कार्यक्रम व त्यानंतर दुपारी 12 ते 2 श्री ह भ प ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर गंगोत्री आश्रम मालेवाडी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला नंतर महाप्रसादाचा कार्यक्रमाने
कलशारोहण सोहळा दिनांक पंचवीस मे दोन हजार बावीस रोजी संपन्न झाला,
याजसाठी केला होता आटाहास । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥
आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥
कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥
अशा प्रकारे कलशारोहण सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमाला पालम पोलीस स्टेशन चे पोलिस निरिक्षक प्रदिप काकडे साहेब व त्यांचे सहकारी , प्रतिष्ठीत नागरीक , पत्रकार आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाला उमरा,खडी, वरखेड,चोरवड,व तालुक्यातील पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते


0 टिप्पण्या