कुंटूर पोलीसाचा देशी दारू दुकानावर मारला छापा, मुद्देमालासह आरोपी गजाआड,

कुंटूर पोलीसाचा देशी दारू दुकानावर मारला छापा, मुद्देमालासह आरोपी गजाआड,



 नांदेड प्रतिनिधी मारोती यन्नावार
 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बरबडा येथील गंगाधर मदेवाड अनधिकृतपणे देशी दारूची चढ्य दराने विक्री करत असल्याची माहिती मिळताच, कुंटुर ठाण्याचे सहाय्यक पोलीस पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी छापा मारून सदर आरोपीसह चार देशी दारूचे बॉक्स जप्त करून, कुंटूर पोलीसाच्या टीमने कारवाई केली, या गावांत अनेक वेळा पोलीसानी वेगवेगळ्या पद्धतीने छापे मारले आणि संबंधित गुन्ह्यातील आरोपीला अटक ही केली आहे 
तालुक्यातील बरबडा येथे दिनांक २१ मे २०२२ रोजी संध्याकाळी ठिक साडे आकाराच्या दरम्यान कुंटूर ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्यासह फौजदार
उपनिरीक्षसंजय अटकोरे बिट जेमादार निखाते, पोलीस नाईक मोहन कंधारे,चालक रामेश्वर पाटील यांनी सापळा रचून छापा टाकून, आरोपी गंगाधर मदेवाड सह देशी दारूचे ४ बॉक्स अंदाजे किंमत ११,५२० रुपयांचा माल जप्त करून, कारवाई केली

बिलोलीच्या दारू बंदी अधिकाऱ्याच्या आशिर्वादामुळे ग्रामीण भागासह खेड्यापाडयात विना परवानगी देशी दारूचे दुकाने थाटून जोमाने विक्री करत असताना सुद्धा दारूबंदीचे अधिकारी दुर्लक्ष करतात, यांचा अर्थ दाल में कुछ काला है,  असा प्रश्न जनतेतुन चर्चा केली जाते, दारू बंदी अधिकारी स्वतःची खळगी भरण्यासाठी देऊघेऊ करू,धाड मारून दारू जप्त करण्या ऐवजी, दुर्लक्ष करत असल्याने, दारू बंदी विभागाच्या अधि शंका व्यक्त केली जात आहे, यामुळे गोरगरीबाचे संसार देशोधडीला जात असल्याचे ही महिला वर्गासह जनतेतून बोलल्या जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या