आंबी पोलिस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलिस उपनिरीक्षक श्री अशिष एस खांडेकर यांनी गोपणीय हेराकडून मिळालेल्या माहितीनुसार मुद्देमालासह आरोपी केला गजाआड

आंबी पोलिस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलिस उपनिरीक्षक श्री अशिष एस खांडेकर यांनी गोपणीय हेराकडून मिळालेल्या माहितीनुसार मुद्देमालासह आरोपी केला गजाआड

परांडा प्रतिनिधी राहुल साळुंखे

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील अंबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरांनी उछाद मांडला असल्याच्या फिर्यादी वरून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डीएस डंबाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 

सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष एस खांडेकर,

पोलिस हेड कॉन्स्टेबल बकल नंबर 493 जीएस मुळे,

पोलिस कॉन्स्टेबल बकल नंबर 1827 सतीश राऊत,

पोलिस कॉन्स्टेबल बकल नंबर 1175 बी.एस.आडसुळ, यांनी


 गोपनीय हेराने दिलेल्या माहितीनुसार, सापळा रचून, मोबाईल चोरांच्या हालचाली वर पोलिस हेड कॉन्स्टेबल बकल नंबर 493 जीएस मुळे यांना तपासाची सूत्रे हालवून, गोपनीय हेरांकडून वेळोवेळी मिळालेल्या माहितीनुसार, पुर्ण टिम सोबत घेऊन, तपासात निष्पन्न झालेला,अटल मोबाईल चोर,आरोपी जाकीर मोहिनोद्दीन तांबोळी वय 40 वर्ष, राहणार डोंजा, तालुका परंडा, जिल्हा उस्मानाबाद यास दिनांक 21 मे 2022 रोजी अटक करून,


पोस्टे आंबी गुन्हा रजिस्टर नंबर 31/2021 कलम 379 भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल केला व त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेल्या,रेलमी कंपनीचा C 11 मॉडेल व रेलमी कंपनीचा 6 pro मॉडेलचे दोन मोबाईल प्रत्येकी किंमत नऊ हजार रूपये असा एकूण अठरा हजार रूपयांचा माल जप्त केला.


मोबाईल चोरीच्या अनेक घटना घडतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते, अंबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मोबाईल चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी डोळ्यात तेल घालून,कसून चौकशी केली व मोबाईल चोराच्या मुसक्या बांधल्या,या कार्याबद्दल अंबी परिसरातील जनता,पोलिस खात्याचे कौतुक करत आहे, 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या