नायगाव ग्रामीण रुग्णालयातील मोफत आहात गैरव्यवहार, अधिक्षकाला निलंबित करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
नायगाव येथे ग्रामीण रुग्णालयात मोफत आहार योजनेत बोगस रुग्न दाखवून २३ लाख ७१ हजार रुपयाचा अपहार, नायगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एच.आर. गुंटूरकर यांना निलंबित करुन या प्रकरणी दोषी असणाऱ्या अन्य लोकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. अन्याय तिव्र आंदोलन छेडण्याच इशारा डेेेेबुजी फोर्सचे प्रदेशाध्यक्ष कैलास तेलंग टेंभुर्णीकर यांनी एका निवेदना द्वारे दिला आहे
नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना मोफत आहार देण्यासाठी यशोधरा महिला सहकारी औद्योगिक उत्पादक संस्थेला कंत्राट देण्यात आले होते. पण सदरील संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. एच.आर. गुंटूरकर यांनी संगनमताने शासनाची फसवणूक करुन मोफत आहार न पुरवताच लाखो रुपयाची बिले अदा केले असल्याची तक्रार झाल्याने या प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी एक समिती नेमली होती परंतु त्या समितीचे काय झाले असा ही प्रश्न करण्यात आला आहे



0 टिप्पण्या