नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर यांनी जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराकडे लक्ष देतील का ? जनतेचा प्रश्न ••

 

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर यांनी जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराकडे लक्ष देतील का ? जनतेचा प्रश्न ••


नांदेड जिल्हा प्रतिनिधी मारोती यन्नावार

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ 
र्षा ठाकूर यांनी जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार गेल्या एप्रिल महिन्या पासून रखडला असताना सुद्धा त्यांच्या पगाराकडे लक्ष देत नसल्याचे सरळ सरळ दिसून येत असून सदरचा पगार होत नसल्यामुळे शासनाची तिजोरी खणखणाट झाली की काय असा प्रश्न जनतेला पडला असून रोड गँगमनासह जिल्हा परिषदेचे शिक्षक आरोग्य विभागाचे कर्मचारी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग अशा कर्मचाऱ्यांचा पगार खोळंबलाअसल्यामुळे जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर यांनी आपल्या वरिष्ठ पातळीवर लक्ष देऊन पगारी करतील का असा प्रश्न कर्मचाऱ्यांसह जनतेला पडला आहे
नांदेड जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्या प्रशासक झाल्यामुळे सदरच्या पंचायत समितीचा कारभार गट विकास अधिकारी यांच्याकडे सोपाविन्यात आला असताना सुद्धा सदरचे गट विकास अधिकारी यांनी शिक्षकांच्या पगाराकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे ही सदरच्या कर्मचारी वर्गातून बोलल्या जात असून याच बरोबर पाणी पुरवठा विभाग नांदेड यांच्या अंतर्गत काम करणारे पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी यांचा ही पगार रखडला असल्‍याचे सदरच्या कर्मचाऱ्यातून बोलल्या जात असून व जिल्हा परिषद आरोग्य विभाग ह्या सुद्धा कर्मचाऱ्यांचा पगार रखडला असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारीअधिकारी सौ वर्षा ठाकूर यांनी सदरच्या पगारी करण्यासाठी दुर्लक्ष का करीत असा प्रश्‍न चर्चेला जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या