पालम तालुक्यातील रामपूर तांडा व पिराचा तांडा येथील मायलेकीसह २ बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली

 पालम तालुक्यातील रामपूर तांडा व पिराचा तांडा येथील मायलेकीसह २ बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली


पालम प्रतिनिधी :-  तालुक्यातील रामापूर तांडा व पिराचा तांडा या दोन गावातील उस तोडीसाठी गेलेल्या ३ मायलेकी व २ बहिणी अशा ५ जणीचा अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा पाझर तलावात धुणे धुण्यासाठी गेल्या असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १४ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे दोन्ही गावावर शोककळा पसरली असून स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.पालम तालुक्यातील बनवस परिसरातील रामापूर तांडा व पिराचा तांडा येथील काही मजूर कुटुंबासह बालाघाट सिद्धी शुगर सहकारी साखर कारखाना येथे ऊस तोडणी च्या कामासाठी गेलेले होते घरातील धुणे धुण्यासाठी मायलेकी व दोन बहिणी या पाझर तलावा कडे गेल्या होत्या मागील काही दिवसात कॅनाल ला पाणी आल्याने या पाझर तलावात पाणी पातळी वाढली होती हे महिला व मुली मजूर तुळशीराम तांडा येथील पाझर तलावामध्ये धुने धुण्यासाठी गेलेल्या आई व दोन मुलीचा आणि इतर दोन मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे रामापुर येथील आई राधाबाई धोंडीबा आडे व त्यांच्या मुली दीक्षा धोंडिबा आडे काजल घोडिया आडे व पिराचा तांडा येथील सुषमा संजय राठोड व अरुणा गंगाधर राठोड या पाच जणी चा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या