आम्ही आदमी पार्टीच्या मुखेड तालुकाध्यक्षपदी विठ्ठलराव इंगळे यांची निवड !

 आम्ही आदमी पार्टीच्या मुखेड तालुकाध्यक्षपदी विठ्ठलराव इंगळे यांची निवड !




नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार


 मुखेड तालुक्यातील आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येऊन तालुकाध्यक्षपदी विठ्ठलराव इंगळे यांची निवड करण्यातआली. 

    सविस्तर वृत्त असे की,आम आदमी पार्टीच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य श्री नरेंद्र ग्रंथीजी यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात येऊन नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री कदम यांनी आम आदमी पार्टीच्या तालुकाध्यक्ष पदाची धुरा विठ्ठल राव इंगळे यांच्या वर सोपविण्यात आल्याचे यावेळी जाहीर केले .तालुक्यात आम आदमी पार्टीला बळकट करण्यासाठी कार्य  करण्याचे आवाहन करण्यात आले. 

       बैठकीस जिल्हा सचिव अवधूत पवार,दयानंद कदम,मुंजाजी व्यवहारे ,अजित पाटील आदि.उपस्थित होते. 

     मुखेड तालुक्यातील नामदेव बोमनवाड,नागनाथ पाटील पाळेकर, संभाजी लवटे,रावसाहेब श्रीपतवाड,शेख बाबूसाहेब आदिसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या