सावरखेड गावाचा विकास हेच खरे ध्येय, ग्रामपंचायत कार्यालयाची वाटचाल विकासाच्या दिशेने - सरपंच सौ जयश्रीताई इजगरे !

 

सावरखेड गावाचा विकास हेच खरे ध्येय, ग्रामपंचायत कार्यालयाची वाटचाल विकासाच्या दिशेने - सरपंच सौ जयश्रीताई इजगरे ! 


सरपंच सौ जयश्रीताई इजगरे यांच आदर्श कार्य


नायगाव तालुक्यातील मौजे सावरखेड नगरीच्या महिला सरपंच विद्यमान सौ जयश्रीताई धोंडिबा इजगरे ह्या गावातील अनेक वर्षा पासून रेंगाळत गेलेला विकास करण्यासाठी महिला सरपंच सरसावल्या असल्यामुळे सदर ग्रामपंचायत कार्यालय आता विकासाच्या दिशेने नेणार असल्याच्या महिला सरपंच सौ इजगरे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितल्या असून गावात अनेक समस्या आहेत पाण्याचा प्रश्न, नाल्याचा, सम्शाम भूमीचा प्रश्न असल्यामुळे सदरचा रखडलेला विकास भरून काढण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच सौ जयश्रीताई इजगरे यांनी सांगितले आहे
तालुक्यातील सावरखेड येथील लोकसंख्या ही बऱ्याच पैकी असल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना वेगवेगळ्या सुविधा चांगल्या प्रकारे मिळाल्या पाहिजे असा मूळ हेतू सरपंच ह्या नात्याने करावे लागणार असून ती ग्रामपंचायत कार्यालयाची व व सर्व टीम म्हणजे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य आणि गावाचे प्रशासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले ग्रामसेवक यांची जबाबदारी असल्यामुळे शासना कडून आलेल्या विविध निधीचा गावाच्या विकासासाठी वापरून गाव विकासाच्या दिशेने नेण्याचा ग्रामपंचायतच्या वतीने प्रयत्न करण्यात येईल असे ही गावच्या महिला सरपंच सौ जयश्रीताई धोंडीवा इजगरे यांनी सांगितले आहे
सावरखेड येथील  समस्त गावकऱ्यानी सरपंच व उपसरपंच पदाच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मोठया मतधिक्याने निवडून देऊन सर्वच सदस्यांना निवडून देऊन सन्मान केला त्यांचे पांग विकासाच्या माध्यमातून परत फेड करण्यासाठी गावच्या विद्यमान महिला सरपंच सौ जयश्रीताई धोंडिबा इजगरे यांनी सांगितले असून गावच्या विकासात नागरिकाला पाणी, लाईट, गावाअंतर्गतचे रस्ते, नाल्या बांध्याकाम, घरकुलाचा प्रश्न ह्या सर्व मूलभूत आवश्यक असलेल्या विकासात्मक बाबी सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असल्याचे सरपंच सौ जयश्री इजगरे असल्याच्या ते सांगितल्या असून गावात काही ठिकाणी नाल्या तुंबल्या असल्यामुळे ते साफसफाई करून गावातील नागरिकांचे आरोग्य टवटवीत ठेवण्यासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न करणार असल्याचे सरपंचानी सांगितले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या