श्री देवी देवस्थान तांबुळगाव येथे श्री देवी भागवत महापुराण नवरात्र उत्सव वर्षं दुसरे साजरा ••

 

श्री देवी देवस्थान तांबुळगाव येथे श्री देवी भागवत महापुराण नवरात्र उत्सव वर्षं दुसरे साजरा ••

पालम प्रतिनिधी व्यंकटेश मोरताटे

श्री देवी देवस्थान तांबुळगाव हे पुरातन कालीन देवस्थान असल्यामुळे देवी तुळजाभवानी माहुर गडावर जात असताना या ठिकाणी दुपारी थांबून पानाचा विडा म्हणजे तांबुल ग्रहण केला असल्याची आख्यायिका असून श्री देवी भागवत कथाकार हभप शेषराव मोहणाजी सोपणे मामा तांबुळगावकर,यांच्या संकल्पनेतून व डोळस विचारातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ दिवस दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत देवी भागवत कथा, चार ते आठ महाप्रसाद, रात्री देवी गीतांचा आराधी मेळा,आशा पध्दतीने नऊ दिवस,श्री देवी देवस्थान तांबुळगाव तुळजापूरचं ठाणं या ठिकाणी,श्री देवी भागवत महापुराण कथा नवरात्र उत्सव वर्षं दुसरे साजरा करण्यात आले आहे
 तांबुळगावकर ,हभप शेषराव मोहणाजी सोपणे मामा तांबुळगावकर यांच्या सुश्राव्य वाणीतून देवी भागवत कथा श्रवणाचा लाभ भाविक भक्तांनी मोठ्या आनंदाने घेतला,यावेळी देवी भक्त माणिकराव सदगे,मारोतराव उंदरे,बाबुराव खर्डे,विठ्ठलराव उंदरे, पुंडलिक आवळे व्यंकटराव उंदरे मानगीर मंडळी मानगीरवाडीकर शेषराव सोपणे शंकर डाहळे इत्यादी भाविकांनी नवरात्र उत्सवात महाप्रसादाचे आयोजन केले दररोज भाविक भक्तांनी कथा श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला आणि श्री देवी देवस्थान तांबुळगाव येथे श्री देवी भागवत महापुराण नवरात्र उत्सव वर्षं दुसरे साजरा करण्यात आला सदर कार्यक्रम घडवून आणण्यासाठी हभप श्री शेषराव सोपने यांचे मोठे योगदान असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या