ओबिसी जागर यात्रेचे परभणीत जंगी स्वागत

 ओबिसी जागर यात्रेचे परभणीत जंगी स्वागत



पालम प्रतिनिधी व्यंकटेश मोरताटे :- डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त नांदेडवून निघालेली १५ एप्रील ते ३० एप्रील या कालावधीत राज्यातील ३२जिल्ह्यात जाणार असलेली obc जागर यात्रेचे दि १८ एप्रील रोजी परभणी शहरात दुपारी १२.३० वाजता जिंतूर नाका येथे आगमन झाले तेथे यात्रेतील सहभागी मान्यवर मा.शाम निलंगेकर,लताताई बंडगर,सोपानराव मारकवाड यांचे हार घालून स्वागत करनेत आले ।नंतर महाराणा प्रताप यांचे प्रतिमेला हार घालून,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे,डॉ बाबासाहेब आंबेडकर,छ.शिवाजी महाराज,महात्मा फुले,वसंतराव नाईक यांचे पुतळ्याला हार घालून अभिवादन करनेत आले।दुपारी १.३० वाजता शहरातील अतिथी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. या यात्रेतील मान्यवरांनी यात्रेमागील भुमिका स्पष्ट  करून सांगीतली.या कार्यक्रमात समाजवादी जनपरिषदचे  राज्य सरचिटणीस आप्पाराव मोरताटे,डॉ.सुनिल जाधव निव्रुत शिक्षण अधिकारी बालासाहेब कुंडगीर,प्राचार्य विठ्ठलराव घुले,प्रा.अमोलसिंह गौतम,निर्मलाताई भालके,सुभाषराव पांचाळ,त्रिशला गायकवाड,सुवर्णा भंडारी,प्रशांत गायकवाड,प्रदिप फाले,आदि मान्यवरासहीत अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते।नंतर हि यात्रा हिंगोलीकडे रवाना झाली।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या