मराठी पत्रकार परिषदेचा तालुका अध्यक्षांचा मेळावा व उत्कृष्ट तालुका,जिल्हा पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे गंगाखेड ७ मे रोजी आयोजन

 मराठी पत्रकार परिषदेचा तालुका अध्यक्षांचा मेळावा व उत्कृष्ट तालुका,जिल्हा पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे गंगाखेड ७ मे रोजी आयोजन



गंगाखेड प्रतिनिधी तुषार उपाध्याय :- दि. १० : मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका आणि जिल्हा अध्यक्षांचा मेळावा आणि आदर्श तालुका आणि जिल्हा पुरस्कारांचे वितरण समारंभ शनिवार दिनांक ७ मे २०२२ रोजी परभणी जिल्ह्यात गंगाखेड येथे करण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांनी केली..

परिषदेशी संलग्न तालुका आणि जिल्हा अध्यक्षांचा मेळावा यापुर्वी नागपूर, पाटण, पालघर, वडवणी, अक्कलकोट आदि ठिकाणी घेण्यात आला होता.. दरवर्षी होणारा हा सोहळा गेली दोन वर्षे कोरोना स्थितीमुळे झाला नव्हता.. मात्र यावर्षी हा खंडीत कार्यक्रम घेण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.. गंगाखेड तालुका पत्रकार संघाने राज्यस्तरीय मेळावा घेण्याची तयारी दाखवल्यानंतर परिषदेचे राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन, मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश नाईकवाडे,

औरंगाबाद विभागीय सचिव विशाल साळुंखे, परिषद कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे, जितेंद्र शिरसाठ, परभणी जिल्हा कार्याध्यक्ष राजेश हट्टेकर आदि पदाधिकाऱ्यांनी आज गंगाखेडला भेट देऊन

गंगाखेड तालुका पत्रकार संघ अध्यक्ष पिराजी कांबळे, कार्याध्यक्ष राहुल डोंगरे, सचिव उत्तम आवंके, कोषाध्यक्ष लक्ष्मण वानखेडे, उपाध्यक्ष सुनील कोनार्डे, अजित गणाचार्य बाळासाहेब राखे, प्रमोद साळवे गोविंद चोरघडे ,भागवत जलाले,

मोहसीन खान, तुषार उपाध्याय या स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि नियोजित कार्यक्रमाच्या जागेची पाहणी केली.. गंगाखेडमधील सुसज्ज सभागृहात हा कार्यक्रम करण्याचे नियोजन असून येणारया तालुका अध्यक्षांची आणि पुरस्कार्थींची उत्तम व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती स्थानिक पदाधिकारी यांनी दिली.. गंगाखेडचा हा कार्यक्रम दोन सत्रात होईल.. उद्घाटनाच्या सत्रात पुरस्कार वितरण समारंभ होईल तर भोजनोत्तर दुपारच्या सत्रात परिषदेची दिशा आणि पत्रकार चळवळीवर परिषदेचे पदाधिकारी मार्गदर्शन करतील..

गंगाखेड हे ऐतिहासिक शहर असून गोदावरीच्या काठावर बसलेले आहे.. संत जनाबाई यांचं जन्मस्थळ असलेली ही पवित्र भूमी दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते.. गंगाखेडला रेल्वे स्टेशन आहे.. नांदेड पनवेल आणि अन्य काही गाड्या येथे थांबतात.. परळी नांदेड मार्गावर गंगाखेड हे परभणी जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे..

कोरोना नंतरच्या काळात परिषदेचा पहिलाच भव्य असा कार्यक्रम होत असल्याने कार्यक्रमास राज्यातील सर्व तालुका आणि जिल्हा अध्यक्षांनी उपस्थित राहावे असे आवाहन एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन, विभागीय सचिव, विशाल साळुंखे, कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे तसेच स्थानिक संयोजन समितीने केले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या