४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर बळीराम भस्के सेवानिवृत्त
डाक कार्यालय परभणीत ठेवण्यात बळीराम भस्के यांचे योगदान
सेवानिवृत्त अभिलेख अधिकारी श्रीराम पिंपरकर यांचे प्रतिपादन
पालम प्रतिनिधी : परभणी येथील डाक सेवेचे कार्यालय नांदेडला स्थलांतरीत करण्यासाठी मांडलेला डाव हाणून पाडण्यासाठी उप अभिलेख अधिकारी बळीराम माधवराव भस्के यांनी केलेला संघर्ष कुणीही विसरू शकत नाही. आजघडीला ते सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांनी उमटवलेल्या कार्याचा ठसा अमिट असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त अभिलेख अधिकारी श्रीराम पिंपरकर यांनी केला.
४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर परभणी रेल्वे डाक सेवा कार्यालयातील उप अभिलेख अधिकारी बळीराम माधवराव भस्के (रा. वाडी खुर्द, ता. पालम) निवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल 3 एप्रिल रोजी परभणीतील श्री मंगल कार्यालयात त्यांना निरोप देण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम पिंपरकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाकसेवेच्या सहाय्यक अधीक्षिका अर्चना देशपांडे होत्या. यावेळी सहाय्यक अधीक्षक यू.व्ही. कुलकर्णी, सहाय्यक निबंधक गिनगिने, सेवानिवृत्त नायब तहसीलदार बालासाहेब लांडे, एलआयसीचे विकास बरडे, शिवा संघटनेचे धन्यकुमार शिवणकर, आरफोर संघटना विभागीय अध्यक्ष सखाराम वाघमारे, सरपंच गजानन भस्के, नारायण चट्टे, राहूल आवरगंड, सुधाकर हनवते, बाबाराव आवरगंड, बाळासाहेब दंडवते, प्रा. सुधाकर शेवटे उपस्थित होते. श्रीराम पिंपरकर पुढे म्हणाले की, बळीराम भस्के यांच्या सकारात्मक विचारसरणीमुळे सर्व कर्मचारी एकत्र आले. त्यांनी लढा दिल्याने परभणी ऑफिस स्थलांतरित होण्यापासून वाचले. ते सेवानिवृत्त झाल्याने कार्यालयास त्यांची उणीव भासेल. अशा शांत, संयमी, कर्तुत्वान अधिकार्यामुळे परभणीचे कार्यालय देखील नावारूपास आल्याचा दाखला त्यांनी दिला. सत्काराला उत्तर देताना श्री. भस्के यांनी समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सामाजिक कार्य करीत राहील, अशी ग्वाही दिली. सूत्रसंचालन शिक्षक संभाजी शेवटे यांनी केले.


0 टिप्पण्या