परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी माननिय श्री धनंजयजी मुंडे साहेब यांची नियुक्ती

 Homeपरभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी माननिय श्री धनंजयजी मुंडे साहेब यांची नियुक्ती

परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी माननिय श्री धनंजयजी मुंडे साहेब यांची नियुक्ती

 

परभणी जिल्ह्यातील राजकारणात नवं चैतन्य



परभणी :- परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी माननिय श्री धनंजयजी मुंडे साहेब,  आल्याने परभणी जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलणार,रामेश्वर प्रभाकरराव बचाटे पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस परभणी यांनी प्रतिनिधीशी बोलताना उद्गार काढले,पुढे बोलताना बचाटे म्हणाले,बाप परदेशी अन् लेकरं बेवारसी अशी परिस्थीती परभणी जिल्ह्यातील जनतेची झाली होती, परंतु,राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय धनंजय जी मुंडे यांची परभणी जिल्हा पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व परभणी जिल्ह्यातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्या पासून,मोठा निर्णय समोर आला आहे,  राष्ट्रवादी काँग्रेसची सिल्वर वरील शरद पवारांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत, नवाब मलिक यांच्या राजीनामा घेऊ नये,अशी भूमिका अनेकांनी घेतली होती,मात्र मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार आखी जाधव यांच्याकडे देण्यात आला असून,नवाब मलिक यांच्याकडील गोंदिया आणि परभणी पालकमंत्रिपद आहेत ते काढून,परभणी पालकमंत्री पद  धनंजय मुंडे यांच्याकडे तर,प्राजक्त तनपुरे यांच्याकडे गोंदिया पालकमंत्री पदाचा कारभार दिला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या