गोंदिया येथील पेशंट साठी धाऊन आले बॉम्बे ब्लड ग्रुपचे डोनर ओमप्रकाश पंडित सर

 गोंदिया येथील पेशंट साठी धाऊन आले बॉम्बे ब्लड ग्रुपचे डोनर ओमप्रकाश पंडित सर

 प्रतिनिधी एन टी बरबडेकर :-  विनोद रामटेकर यांना मूत्र पिंडाचा आजार झाला आहे. ते सध्या केएमजे हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत. उपचार पूर्वी डॉक्टर यांनी शरीरात रक्ताची कमी आहे असे सांगितले. आपणास माहिती आहे रक्ताचे चार प्रकार पण विनोद यांना पाहिजे होते. 

जगातील अती दुर्मिळ रक्तगट ते पण बॉम्बे ब्लड ग्रुप वीस लाख लोकांच्या मध्ये एखादी व्यक्ती बॉम्बे ब्लड ग्रुप चा आढळतो... पण बॉम्बे ब्लड ग्रुप डोनर शोधायचा कसा असा प्रश्न पडला तेंव्हा नांदेड येथील माधव मारोतीराव सुवर्णकार यांनी  पूर्णा येथील रहिवाशी ओमप्रकाश पंडित सर यांना लगेच संपर्क करून गोंदिया येथील लागणारी बॉम्बे ब्लड ग्रुपची तातडीची गरज आहे 

हि बातमी कळवताच ओमप्रकाश पंडित सर यांनी हातातील काम सोडून तात्काळ नांदेड गाठले आणि रक्तदान केले. ह्या आगोदर माधव सुवर्णकार व पवन पाटील सांगली हे दोघे पण रक्तदान केले होते. गोळवलकर ब्लड बँक येथील शिंदे सर व त्यांची पूर्ण टीम यांचा पण सहभाग लाभला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या