पाणी पुरवठा करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या पत्राची माजलगाव न.प.कडुन बेदखल.

 पाणी पुरवठा करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या पत्राची माजलगाव न.प.कडुन बेदखल.

माजलगाव प्रतिनिधी :  शहरातील दालमील रोड जवळील महेबूब नगर, रहेमत नगर, अक्सा मस्जिद येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या पत्रा बाबत माजलगाव न.प.प्रशासन बेदखल झाल्याचे मुस्ताक कुरेशी यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे सांगितले आहे. संबधीत समस्या बाबतीत जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेवर आंदोलने, निवेदन देऊन पण दखल घेतली नाही पण विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकाऱ्यांना तातडीने जातीने लक्ष द्या असे आदेश दिले होते पण नगरपरिषद प्रशासन कसल्याच प्रकारची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्नशील राहिले नाही असा आरोप मुस्ताक कुरेशी यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे केला आहे. याबाबत प्रसिद्धि पत्रकात पुढे नमुद करण्यात आले आहे की,

प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने दिलेल्या निवेदनात गेल्या कित्येक वर्षांपासून वरील वस्त्यांमध्ये पिण्याचे पाणी नसून तेथील नागरीकांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत. या संर्दभात न.प.प्रशासनाचे उपायुक्तांनी जा.क्रं.-२०२२/न.प.प्रशा.मुख्य अस्था/कावि-१०९३ दिनांक १३जानेवारी-२०२२च्या पत्रान्वये मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले होते की, संबंधीत तक्रारदार मुस्ताक अब्दुलबाकी कुरेशी यांनी दिलेल्या निवेदन मागणी संर्दभातील अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात यावा. परंतु अद्यापपर्यत उपायुक्तांच्या पत्राची दखल माजलगाव न.प.प्रशासनाने घेतली नाही अशी माहिती मुस्ताक कुरेशी यांनी दिली नाही. उन्हाळ्याच्या दिवस  असल्याने तेथील रहिवाशांना पाण्याची समस्यांना समोर जावे लागणार आहे. तरी जिल्हाधिकारी तात्काळ लक्ष देऊन पाण्याची सोय करावी अशी मागणी प्रहार जनशक्ति  संघटनेचे तालुका अध्यक्ष गोपाल पैजने, उपाध्यक्ष नितीन कांबळे, शहर अध्यक्ष मुस्ताक कुरेशी सह खालेक कुरेशी,आलीशेर कुरेशी, अशोक ढंगे,सरफराज कुरेशी,अल्ताब मोईन कुरेशी,मोबिन कुरेशी, इस्माइल बागवान यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या