महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे होऊन काम करणे खूप आवश्यक आहे :- तहसीलदार मॅडम

 महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे होऊन काम करणे खूप आवश्यक आहे :- तहसीलदार मॅडम

पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव :- केरवाडी दिनांक ८ मार्च २०२२ रोजी केरवाडी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमी केरवाडी येथे महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन पालम तालुक्याच्या तहसिलदार मॅडम सौ प्रतिभाताई गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पालम तालुका कृषी अधिकारी श्री देशमुख साहेब, आत्मा गटाचे पालम तालुका प्रमुख श्री साळुंखे साहेब, केरवाडी गावच्या सरपंच सौ.मीराताई जाधव, सौ. अंजनाताई बिडगर नगरपालिका गंगाखेडच्या प्रकल्प अधिकारी हे उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. गंगा माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले तसेच तहसीलदार मॅडम यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या कि महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे होऊन काम करणे खूप आवश्यक आहे तरच महिलांचे सक्षमीकरण होईल. महिलांनी महिलांच्या अडचणी सोडवाव्या, व्यवसायत भरारी घेऊन आर्थिक क्षमता वाढवावी.  महिलांनी प्रत्येक सामाजिक/राजकीय सहभाग वाढवावा आणि बालविवाह सारख्या प्रथा बंद करण्यास भाग पाडावे. संविधानाने प्रत्येकाला याबाबत हक्क दिलेले आहेत त्याचा योग्य उपयोग करावा.

तालुका कृषी अधिकारी देशमुख साहेब यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना म्हणाले कि कृषी विषयक योजना महिलांसाठी भरपूर असून त्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा आणि वेळोवेळी कृषी विभागाला भेट द्यावी आणि महिलांना आमच्या कार्यालयाकडून नेहमी सहकार्य राहील. भविष्यात महिलांचा कृषी क्षेत्रात सक्रीय सहभाग वाढण्यासाठी शासनाकडून प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे तरी सर्व महिलांनी सहभागी होऊन कृषी योजनाचा लाभ घ्यावा.

गंगाखेड व केरवाडी येथील योगेश्वरी , श्रीराम. सिद्धलिंग शिवाचार्य महिला बचत गटाच्या अध्यक्षांनी आपले अनुभव कथन केले  तसेच प्रियदर्शिनी ग्रामीण बिगरशेती महिला सहकारी पतसंस्थेच्या लाभार्थ्यांनी वैयक्तिक कर्ज घेतलेल्या सभासदांनी अनुभव सांगितले. या निमित्ताने  सामुहिक आणि वैयक्तिक  पातळीवर उत्कृष्ट व्यवसाय करणाऱ्या महिलांचा सत्कार मा. तहसिलदार मॅडम व कृषी अधिकारी यांनी केला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शोभा कुलकर्णी यांनी केले आणि आभार प्रदर्शन सौ.गवळण शिंदे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.मंगल शेटे, मीरा बडवणे, दिपाली जाधव , अर्जुन चव्हाण यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या