माजलगाव शहरातील स्वछता व पाणी नियोजनाचे तीन तेरा विभागीय आयुक्त साहेब यांचे पत्र धुडकूण लावले...
नगरपरिषद ,बाजार समिती आदी ची स्वछता गुलदस्त्यातच .
माजलगाव, प्रतिनिधि:-
माजलगाव शहरासाठी लाखो करोडो चा निधी येऊन पण प्राथमिक सुविधासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे धरण उशाला कोरड घशाला अशी गत झालेली आहे .शहरातील मेहबूब नगर,,आझाद नगर, पाटील गल्ली सिरसाट गल्ली ,बागवान गल्ली जुने बस स्थानक मोंढा,शाहू नगर आदी परिसरात नगर परिषद ,बाजार समिती स्वछते वर दरवर्षी करोडो चा निधी खर्च करते पण शहरात सना सुदीला स्वछता होत असल्याने व्यापारी व नागरिकात नाराजगी चे वातावरण आहे .
माजलगाव शहरातील अनेक भागात रस्त्यावर जागो जागी कचऱ्याचे ढीग साचलेले असताना शहरातील व जुना मोंढा परीसारतील रस्ते सफाई दुर्लक्षित होत असल्याने नागरिकांच्या व व्यापार्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची चर्चा आहे ,रस्त्यातील घाण, स्वछता गृह आदीची मागणी वेळो वेळी करून पण अर्धवट नियोजना ने व्यवस्थेला बगल दिल्याची चर्चा माजलगाव करात आहे.
चार दिवसाला पाण्याचे स्वप्न अल्लाउदिन च्या चिरागातच
माजलगाव शहराला स्वताचे जलाशय असताना पण अनेक वर्षा पासून ४ दिवसाला पिण्याचे पाणी सोडण्याची मागणी शहरातील नागरीकातून होत असताना पण शहर वासियांना ८ ते १५ दिवसाला पाणी मिळत तसेच महेबुब नगर मधिल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जातिने लक्ष्य देय असे आदेश विभागीय आयुक्त साहेब यांनी देले पण नगरपरिषद कार्यालय काढुण आदेश ला धूडकुण लावले.उन्हाळ्याचे दिवस आले असल्याने पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे .माजलगाव जलाशयात पुरेसे पाणी असल्याने नागरीकातून शहरात पिण्याचे पाणी चार दिवसाला सोडण्याची मागणी होत आहे.
जुनी पाण्याची टाकी पडण्यास लाखो खर्चून हि नवीन चे काम गोलमटोल च
शहरातील मोंढा प्रभागतील असणारी पाण्याची टाकी पाडण्याचे काम २ महिन्या पासून जोमात आहे पण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीचे मोठ्या जोशात उद्घाटन करून हि काम चालू न झाल्याने शहरातील नागरिकत उन्हाळा तोंडा समोर असल्याने संतापाचे वतावरण आहे.. टाकी पडण्यासाठी जसे लाखो खर्च करता तसे लवकरात लवकर नवीन टाकी बांधून २ दिवसाला पाणी सोडण्याची मागणी माजलगाव करातून होत आहे ..
नगरपरिषद च्या गलथान कारभाराने पाणी व स्वछतेच्या नियोजनाचे निधी येऊन पण बारा वाजलेले पाहायला मिळत आहेत आता तरी व्यवस्थित नियोजन करून पिण्याचे पाणी चार दिवसाला सोडावे
प्रल्हाद भालेकर, ( नागरिक )
नगरपरिषद ने यावर दुर्लक्ष केल्यास नागरिकांना घेऊन हंडा मोर्चा उपविभागीय व जिल्हा अधिकारी कार्यालय वर काढला जाईल
गोपाल पैजणे (प्रहार तालुका अध्यक्ष)

0 टिप्पण्या