रेगुलर विज बिल भरणाऱ्यांना तोच न्याय हे चुकीचं- सखाराम बोबडे पडेगावकर

 रेगुलर विज बिल भरणाऱ्यांना तोच न्याय हे चुकीचं- सखाराम बोबडे पडेगावकर

गंगाखेड प्रतिनिधी:- विज बिल वसुलीच्या नावाखाली संपूर्ण जिल्हाभर वीज तोडणी सुरू आहे. यात नेहमीच वीजबिल भरणार्‍या ग्राहकांनाही तोच न्याय दिला जात आहे हे चुकीचं असल्याचं प्रतिक्रिया परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली.

संपूर्ण परभणी जिल्ह्यात आज घडीला अडीचशेच्या वर गावे अंधारात आहेत. दहावी व बारावी परीक्षेचा कार्यकाळ सुरू असतानाच महावितरण कंपनी विज बिल वसुलीच्या नावाखाली वीजतोडणी अभियान सुरू केले आहे. जे ग्राहक रेगुलर दर महिन्याला वीज बिल भरतात त्यांच्यासाठी संपूर्ण डेपोवरील वीज तोडणी करण्यापूर्वी वेगळी व्यवस्था करणे गरजेचे असतानासुद्धा

 महावितरण कंपनीकडून रेगुलर वीज भरणाऱ्या ग्रहाकाकडे मात्र कानाडोळा केला जात आहे  एकूणच रेगुलर वीज भरणाऱ्या ग्राहकांनी कंटाळून इतरांसारखाच वीज बिल थकवावे. व शंभर टक्के थकबाकी च्या नावाखाली संपूर्ण महावितरण कंपनी 100% खाजगी कंपनीला विकून टाकण्याचा  सरकारचा डाव असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. महावितरण अधिकाऱ्यांनी रेगुलर वीज भरणाऱ्या ग्राहकांचा पुरवठा पूर्ववत न केल्यास लवकरच जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या