उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या शासकिय गाडीला काळी फिल्म! वाहतुकिचे नियम केवळ सर्वसामान्यां साठीच का ?

 उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या शासकिय गाडीला काळी फिल्म! वाहतुकिचे नियम केवळ सर्वसामान्यां साठीच का ?


 माजलगाव प्रतिनिधी:- सर्वांना समान न्याय असणारी व्यवस्था आपल्या देशात लोकशाहीच्या माध्यमातून प्रचलीत आहे. पण त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होताना दिसत नाही. -गाड्यांना काळी फिल्म लावण्यास बंदी आहे. याचे उल्लंघन करणान्यास दंडही आकारला जातो. मात्र, माजलगावात चक्क शासकिय गाडीच्या काचांवर काळी फित चढविण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार या प्रमुख अधिकाऱ्यांच्या गाडीलाच काळ्या फित असल्याचे दिसून आले आहे. वाहतुकीचे नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच आहेत काय, अशी चर्चा तालुक्यात होत आहे.


 माजलगाव उपविभागाच्या उपजिल्हाधिकारी यांच्या शासकीय (एम. एच. २३ एएफ००६४), आणि तहसिलदार वापरत असलेल्या (एम. एच. २३ फ १००८) या गाड्याचे

का हे पारदर्शक असणे अपेक्षित आहे. परंतु सर्वच काचांना काळी फिल्म लावण्यात आलेली आहे. गाडी शासकीय असो की खासगी त्याची काच ही नेहमी पारदर्शक असणे क्रमप्राप्त आहे. असे नसेल तर मोटार वाहन कायद्यानुसार कलम १०० (२) १७७ अंतर्गत दंड व भरून तात्काळ ती काळी फिल्म काढावी लागते. वास्तविक पाहता अशी नियमावली असताना प्रशासनातील क्लास वन, क्लास टू अधिकारीच जर नियम तोडून वर्तन करत असतील तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मध्यंतरी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी जालिंदर बनसोडे छ. शिवाजी महाराज चौकात कर्तव्य बजावत असताना जिल्हा न्यायाधीशांनी सीट बेल्ट घातला नव्हता म्हणुन त्यांनी जाग्यावरच दंडाची रम वसूल करूम पावती दिली होती. याची चर्चा बरेच दिवस सुरू होती. त्याच धर्तीवर कर्तव्याची अंमलबजावणी होणार का अशी चर्चा होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या