मौजे तांबुळगाव येथील जय भवानी स्वयंसहायता गटाकडून बचत गटातील महिलांना आर्थिक सहाय्य

 

मौजे तांबुळगाव येथील जय भवानी स्वयंसहायता गटाकडून बचत गटातील महिलांना आर्थिक सहाय्य

 मौजे तांबुळगाव येथील जय भवानी स्वयंसहायता गटाकडून बचत गटातील महिलांना आर्थिक सहाय्य






पालम (विनोद कांबळे) :- मौजे तांबुळगाव येथील जय भवानी स्वयंसहायता गटामध्ये एकूण दहा महिला सदस्य असून, सर्व महिला बचत गटाचा निधी वेळेत जमा करत असून, प्रत्येक महिला बचत गटाच्या नियमाचे पालन करून,रकमेचा भरणा व्यवस्थीत करत असल्याने, बचत गटाची रक्कम जमा होत असते, त्या रकमेतून ज्या महिलांना आर्थिक अडचण आली असेल त्या महिलांना, जय भवानी स्वयंसहायता महिला बचत गटाकडून आर्थिक अडचण भागवण्यासाठी, आर्थिक सहकार्य केल्या जातं, त्या अनुषंगाने बचत गटातील सदस्य संगीता भगवान आवळे व अनिता माधव खर्डे यांना त्यांची आर्थिक अडचणी साठी जय भवानी स्वयंसहायता महिला बचत गटाकडून, प्रत्येकी दहा हजार रुपयाचं अर्थसहाय्य देऊन सहकार्य केले, यावेळी जय भवानी सहाय्यता महिला बचत गटाचे अध्यक्षा सौ.सविता शेषराव सोपणे व सचिव सौ सरुबाई भगवान उंदरे यांच्या हस्ते दोन्ही सदस्यांना, प्रत्येकी दहा हजार अर्थसहाय्य देऊन, त्यांची आर्थिक अडचण दूर केली, सदर महिलांनी घेतलेल्या अर्थसहाय्यातून व्यवसाय करून, आर्थिक स्वावलंबन करू असे अर्थसाह्य घेताना बोलून दाखवले, अर्थसाह्य देत असताना बचत गटातील सर्व महिला, अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या