पालम तालुक्यातील तांबुळगाव येथे स्वयंशासन दिन साजरा
पालम तालुक्यातील तांबुळगाव येथे स्वयंशासन दिन साजरा
पालम प्रतिनिधी :- सविस्तर बातमी अशी की,जिल्हा परिषद शाळा तांबुळगाव ता.पालम जि.परभणी येथे शाळेतील सर्व शिक्षकांच्या नियोजनातून स्वयंशासन दिना चा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पात्र करून प्रत्येक विषयावर आपला असणार प्रभुत्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच नंतर या तांबुळगाव च्या शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण जोरवर आणि सर्व शिक्षक संच यांनी खरोखरच या विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारची तयारी करून घेतलेली दिसत आहे त्या अनुषंगाने या तांबुळगाव च्या या घेतलेल्या स्वयंशासन दिनाच्या कार्यक्रमाचा आदर्श सर्व शाळांनी घेऊन जर असंच मुलांना प्रशिक्षण देऊन आपण शिक्षक झाल्यानंतर काय करू शकतो ही जाणीव आणून देऊन त्यांना हे शिक्षणामध्ये आकर्षण निर्माण करण्याचे एक चांगले माध्यम आहे असे या कार्यक्रमातून दिसून आलं यावेळी गावातील नवोदित चेअरमन पंडितराव जोरवर नवोदित अध्यक्ष शिवाजी आवळे धोंडीबा ससाने गोविंद्रावजी बंडे आणि तांदूळ गावचे सरपंच बाबुराव खर्डे व इतर प्रतिष्ठीत मंडळी आणि अंगणवाडी चे कार्यकर्ते हे सर्व उपस्थित होते


0 टिप्पण्या