पालम तालुका काँग्रेस कमिटी च्या तालुकाध्यक्ष पदी कृष्णा (भैय्यासाहेब)भोसले यांची नियुक्ती
मा.राज्यमंत्री सुरेशरावजी वरपुडकर साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.
प्रतिनिधी पालम:- पालम तालुका काँग्रेस कमिटी च्या तालुकाध्यक्ष पदी कृष्णा (भैय्यासाहेब) भाऊसाहेब भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती आतापर्यंत केलेल्या कार्य, पक्षसंघटनेविषयी सम्मान कामाप्रती असलेला आपला आत्मविश्वास, जिद्दी, चिकाटी व सातत्य पाहता ही निवड करण्यात आली.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. सोनिया गांधी जी, आपले नेते राहूल गांधी जी व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाजी पटोले यांचे विचार आणि महत्वाच्या राष्ट्रीय प्रश्नावरील भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपण नेहमीच तत्पर असाल याची मला खात्री असुन पक्ष बळकट करण्यासाठी आपण सदैव कार्यरत रहाल अशी सदिच्छा ही मा.खा. सुरेशरावजी वरपुडकर यांनी व्यक्त केली.
या निवडीबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने कृष्णा भोसले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

0 टिप्पण्या