टेनिस बॉल स्पर्धेचे विजयी स्पर्धकांनचे बक्षीस वितरण समारंभ संप

 टेनिस बॉल स्पर्धेचे विजयी स्पर्धकांनचे बक्षीस वितरण समारंभ संप

प्रा.डॉ. संजय बालाघाटे व भाजप पदाधिकारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण



प्रतिनिधी पालम :- सविस्तर बातमी अशी की,महाशिवरात्री निमित्त  मु पिंपळगाव ता पालम येथे भव्य टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन केले होते.  हे आयोजन संतोष भाऊ मुरकुटे मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.आज दिनांक १३ रोजी विजयी संघाचे बक्षीस वितरण करण्यात आले.  हा कार्यक्रम मा संतोष भाऊ मुरकुटे भा ज पा कार्यकारणी सदस्य कार्यालय पेठशिवणी येथे संपन्न झाले.  प्रा.डॉ.संजय बालाघाटे , संपादक विनोद कांबळे, शेषेराव सोपणे ,  शिवाजीराव दिवटे सर तालुका अध्यक्ष (भा ज पा ), साहेबराव सुरनर ,बालाजी (आण्णा )बरडे, मधुकर कराळे, रूपेश (अंकल) शिनगारे, विनायक गायकवाड बलोरे (आप्पा ) ,बालू (आज्या ) बरडे ,नागेश सोनटक्के , पत्रकार चांद भाई यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक नागेश सोनटक्के सरपंच पिंपळगाव, काळेश्वर  भाटेगावकर, शिवाजी  सोनटक्के, धोडिबा सोनटक्के, रंगनाथ सोनटक्के ,राजु सोनटक्के व या वेळी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित  होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या