तहसीलदार गोरे यांच्या हस्ते शिधापत्रिकेचे वाटप.
गुडसुर .(सा.वा )येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात तहसीलदार रामेश्वर गोरे साहेब यांच्या हस्ते शिधापत्रिके चे वाटप करण्यात आले.
मा. नामदार संजय भाऊ बनसोडे साहेब यांच्या संकल्पनेतून उदगीर तालुक्यात शिधापत्रिका वाटप करण्याचे संकल्प शासनाकडून राबविण्यात येत आहे याची सुरुवात गुडसुर येथून करण्यात आली यावेळी गुडसूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शिधावाटपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उत्तमराव सूर्यवंशी हे होते
तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर चे तहसीलदार मा. रामेश्वर गोरे साहेब, नायब तहसीलदार बेबळगे, मंडळ अधिकारी संतोष चव्हाण, तलाठी शिवानंद गुंडरे, प्रा. श्याम डावळे, प. स. उप. सभापती बाळासाहेब मरलापल्ले, उपसरपंच बालाजी देमगुंडे, ग्रामपंचायत सदस्य माधव टेपाले, त.म. अध्यक्ष विठ्ठलराव मरलापल्ले, ग्रामपंचायत सदस्य विरोचन तोटकर, कृषी उत्पन्न बाजार समिती मा. संचालक शिवानंद तोटकर व आदी पाहुणे उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा. तहसीलदार साहेबांनी गुडसुर येथे सर्व लाभार्थ्यांना शिधापत्रिका, शिधापत्रिका फोड, तसेच श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार या योजनेच्या लाभार्थ्यांना साठी तालुक्यात जाण्याची गरज भासणार नाही तर गुडसूर येथेच शिबिर भरून कामे करण्याचे आश्वासन दिले तसेच प्रा. श्याम डावळे म्हणाले की मा.ना. संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर तालुका विकासाचे उत्तुंग शिखर गाठत असल्याचे त्यांनी सांगितले त्यांनी गुडसुर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सभा मंडपा साठी 25 लक्ष व इतर विकास कामासाठी 15 लक्ष दिल्याची माहिती यावेळी दिली यावेळी उपसरपंच बालाजी देमगुंडे यांनी ही आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद गुडसूरकर यांनी केले तर आभार पत्रकार नागेश नवाडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश कुलकर्णी, लक्ष्मण सूर्यवंशी, संजय गोतावळे, असलम पठाण, सुभाष सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या