कै. श्रीमती काशिबाई वैजिनाथ स्वामी यांचे दिर्घ आजाराने निधन.

 कै. श्रीमती काशिबाई वैजिनाथ स्वामी यांचे दिर्घ आजाराने निधन. 

लातूर जिल्हा प्रतिनिधी:- हरंगुळ बुद्रुक येथील श्रीमती काशिबाई वैजिनाथ स्वामी यांचे दिर्घ आजाराने दि. ११ मार्च वार शुक्रवार रोजी निधन झाले.

 त्या शिवभक्त परायण शिवमुर्ती स्वामी महाराज हरंगुळकर व पंडित डॉ. शिवरुद्र स्वामी हरंगुळकर यांच्या मातोश्री होत्या. तर परभणी जिल्ह्यातील पाथरी मठाचे मठाधिपती श्री काशिनाथ शिवाचार्य महाराज यांच्या आजी होत्या. 

 कै. श्रीमती काशिबाई वैजिनाथ स्वामी या मृत्युसमयी ८५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे दोन मुले, एक विवाहित मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.  

अंत्यविधी हरंगुळ (बु) ता. जि. लातुर येथे आज वार शुक्रवार दिं. ११ मार्च रोजी सकाळी ११:०० वाजता होणार आहेत.  

कै. श्रीमती काशिबाई वैजिनाथ स्वामी यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या