मौजे गुंज येथे अवैध माती तस्करी करणारे तीन ट्राक्टर पकडून कारवाई करण्यात आली
दिनांक 8 फेब्रुवारी, सविस्तर बातमी अशी की काल सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास सूत्राच्या अनुसार माहिती मिळाली त्या प्रमाणे तहसील कार्यालयाने गुंज येथे सकाळी अवैधरीत्या माती तस्करी करणाऱ्या तीन ट्राक्टर पकडण्यात यश आले आहे. पालम तालुक्यातील अवैधरित्या माती, तस्करी करण्यासाठी तराफे , ट्राक्टर , जेसीबी इ. साह्याने माती , वाळू चोरली जात आहे याची माहिती तहसील कार्यालयाला मिळताच तहसीलदार मॅडम व त्यांच्या सहकारी टीम नी सकाळी गुंज गावात छापा टाकून ही कामगिरी केली आहे. यामध्ये तीन ट्राक्टर मातीसहीत पकडुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली . यावेळी तहसीलदार मॅडम ,तलाठी बोंदाडे साहेब ,मंडळ अधिकारी के पी शिंद, महसूल सहाय्यक शिवप्रसाद वाव्हळे, रामेश्वर केंद्रे, कैलास आगळे,महेपती कांबळे, लक्ष्मण जाधव यांच्या साह्याने ही मोठी कारवाई करण्यात आली. ही कारवाई अचानक झाल्यामुळे अवैध माती तस्करी करणाऱ्यांच्या मनात एक भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.

0 टिप्पण्या